सहकार आणि लेखा विषयात शासकीय पदविका
युजरसाठी मार्गदर्शक सूचना
पॉप अप ब्लॉकर मार्गदर्शन
(फाईल आकार : 273 केबी)
छायाचित्र आणि स्वाक्षरी क्रॉप करण्यासाठी सूचना
(फाईल आकार : 610 केबी)
प्रोफाइल निर्माण आणि ऑनलाईन अर्जासाठी सूचना
(फाईल आकार : 253 केबी)
अधिक मार्गदर्शक सूचना
युजर
लॉग इन
पासवर्ड विसरलात
नोंद करा
मदत
ओळ
×
सहकार आणि लेखाविषयक शासकीय पदविका हेल्पलाईन
022-4029 3000
सहकार विभागासाठी पर्याय क्र. 4 निवडा
आमच्या प्रतिनिधींशी बोला आणि तक्रार क्रमांक प्राप्त करा
सूचना: सोमवार ते शुक्रवार (दरमहा दुसरा आणि चौथा शनिवार वगळता अन्य शनिवार) या दिवशी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत सहाय्य उपलब्ध
परीक्षा
जाहिरात
×
परीक्षेची जाहिरात
(पीडीएफ फाइल डाऊनलोड करण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा)
सहकार आणि लेखाविषयक शासकीय पदविका मंडळ (जीडीसीए मंडळ)
N
e
w
s
**बातमी**
1. जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा, 2025 साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 17/03/2025(रात्री 8.00 वाजेपर्यंत) पर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि.24/03/2025 पर्यंत (बँकेचे कामकाजाचे वेळेत) करण्यात आलेली आहे.
2. अर्ज बाद होण्याची महत्वाची कारणे- (अ) विवाहित महिलांच्या बाबतीत नावात बदल झाल्याचा पुरावा जोडलेला नसल्याने (ब) कॉमर्स पदवी धारकांना कोणत्याही विषयाची सुट मिळत नसतांनाही सुट मिळणेबाबत मागणी केल्याने
पासवर्डमध्ये लहान आणि मोठ्या लिपीतील अक्षरे, विशेष वर्ण आणि क्रमांकाचा समावेश असावा
×
अर्ज सादरीकरणाचे टप्पे
अर्ज सादरीकरण प्रक्रिया
अर्ज सादरीकरणाचे 3 मुख्य टप्पे आहेत
प्रोफाइल निर्मिती/अद्यतन
अर्जाचे सादरीकरण
माझे खाते विभागामार्फत शुल्क भरणा
तपशिलवार टप्पे
तुम्ही नवीन युजर असल्यास GDC&A या संकेतस्थळावर लॉग इन करण्यासाठी युजर नेम आणि पासवर्ड निर्माण करा.
GDC&A या संकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर आपल्या संपूर्ण प्रोफाइलची नोंद करा. प्रोफाइल तपशिलाच्या नोंदीला सुरूवात करण्यापूर्वी आपले छायाचित्र ( आकार - रूंदी 3.5सेमी, उंची 4.5 सेमी) आणि आपली स्वाक्षरी ( आकार - रूंदी 3.5सेमी, उंची 1.5 सेमी) स्कॅन करून तयार ठेवा. प्रतिमा जेपीजी स्वरूपात असाव्यात आणि त्यांचा आकार 50 केबी पेक्षा जास्त असू नये.
नंतर परीक्षेसमोर दिसणाऱ्या "अर्ज करा" या दुव्यावर क्लिक करा.
परीक्षेच्या पेपरचा तपशील पटलावर स्वयंचलितरित्या दिसू लागेल आणि एखाद्या पेपरसाठी सवलत मिळाली असल्यास तेथे अर्जदाराला माहितीची नोंद करावी लागेल. अर्जदाराला केंद्र तपशिलाची निवड करावी लागेल आणि नंतर तो दाखल करावा लागेल. ( एकदा निवडलेले केंद्र पुन्हा बदलता येणार नाही.)
तुमच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध तपशील स्वयंचलितरित्या तुमच्या आवेदन अर्जात नमूद केला जाईल. शिल्लक तपशिलाची नोंद करा आणि अर्ज सादर करा.
अर्ज सादर केल्यानंतर "माझे खाते" या दुव्यावर क्लिक करा. पृष्ठाच्या डावीकडे "परीक्षेचा प्रकार" या दुव्यावर क्लिक करा. आपण सादर केलेला अर्ज प्रदर्शित होईल.
ॲप्लिकेशनच्या दर्शनी भागातील 'पे नाऊ' या दुव्यावर क्लिक करा. येथे "ऑनलाईन भरणा/चलानद्वारे भरणा" असे पर्याय दिसतील
बँक चलानद्वारे भरणा करण्याचा पर्याय निवडल्यास जारी चलानची प्रिंट घ्या आणि अंतिम मुदत समाप्तीपूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, एसबीआयच्या कोणत्याही शाखेत शुल्क भरणा करा. भरणा केल्यानंतर 24 तासांच्या अवधीत अर्जासमोरील भरणा स्थिती "प्रदान" झाल्याचे दर्शवेल. ऑनलाईन भरणेच्या बाबतीत यशस्वी व्यवहारानंतर लगेचच हे अद्यतन होईल.